जाहिरात

कोण घेणार माघार? विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत

Vidhansabha Election 2024: विधानसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (सोमवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे कोण माघार घेणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे.

कोण घेणार माघार? विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत

Mumbai: महाराष्ट्राच्या  विधानसभा निवडणुकीसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरलेत. अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यत आहे.  महायुतीतील बंडखोरांनी  उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड घडपड चालवली असून, त्याचा परिणाम काय होतो हे काही तासांत कळेलच. यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली. जवळपास 3 तास ही बैठक चालली. यात बंडखोरी रोखण्याबाबात, अर्ज माघारी घेण्याबाबत चर्चा झाल्या. पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंडखोर पक्षाची डोकेदुखी वाढवली असून, आमचे 90 टक्के बंडखोर माघार घेतील असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शिंदेंच्या विरोधात भाजपचे 9 बंडखोर मैदानात आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी विरोधात शिंदे गटातील 7 जणांनी अर्ज भरले आहे. जर निश्चित कालावधीत उमेद्वारी अर्ज मागे घेतले गेले नाही तर, महायुतीसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांना बंडखोरांना शांत करणं एकप्रकारच आव्हानच आहे.

मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न; विधानसभा निवडणुकीतून माघार

(नक्की वाचा: मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न; विधानसभा निवडणुकीतून माघार)

    काही वेळापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाबरोबर काल संध्याकाळी चर्चा झाली. जयंत पाटील राऊतांकडे आले होते. माझ्याशी त्यांचं फोनवरुन बोलणं झालं. त्यानुसार आम्ही उरणची जागा लढवत आहोत. अलिबाग, पेण आणि पनवेल येथे शेकाप जागा लढवतील. यासाठी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना सूचना गेल्या आहेत. त्याशिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते यांनी अनेक बंडखोर नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

    Maharashtra Election 2024 : सदा सरवणकरांचे उमेदवारी मागे घेण्याचे संकेत? नेमंक काय म्हणाले...

    (नक्की वाचा: Maharashtra Election 2024 : सदा सरवणकरांचे उमेदवारी मागे घेण्याचे संकेत? नेमंक काय म्हणाले)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम  मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, माहीममध्ये शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना त्यानी साफ नकार दिला आहे. त्याचबरोबर  शिवसेनेने (उबाठा) महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरे, सरवणकर, सावंत अशी तिहेरी लढाई माहिममध्ये जाली तर, विजयाचे पारडे कुणाकडे झूकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आज  सरवणकर अर्ज मागे घेणार? की तिहेरी लढत पक्की करणार, याकडे सगळ्यांच  लक्ष लागलं आहे. बोरिवलीमध्ये भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्याविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरलाय. शेट्टी यांना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या निवासस्थानी बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यानंतरही शेट्टी यांनी अर्ज मागे घेणार की नाही, हे स्पष्ट केले नाही. 

    लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघातून भाजपचे विशवजित गायकवाड यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे रविवारी जाहिर करण्यात आले. त्यामुळे, सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवारांची नावं दिली आहेत. पण राज्यातील २८८ मतदारसंघांत पात्र उमेदवारांची संख्या ७०६६ इतकी आहे. यातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात, हे आज स्पष्ट होईल.
     

    Listen to the latest songs, only on JioSaavn.com