'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. शिवाय या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास, योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे असेही सांगितले आहे. या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ
योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शिवाय योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र महीलांना महिन्याला दिड हजार रूपये देण्यात येणार आहेत. यासाठी 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातल्या महीलांसाठी हा माहेरचा आहेर आहे. त्यांची या योजनेतून कोणत्याही पद्धतीची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world