ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडून कॅमरन ग्रीन पाठीच्या दुखापतीमुळे पुढील अनेक दिवस क्रिकेटपासून दूर राहणार आहेत. ग्रीन पाठीच्या दुखापतीमुळे आता भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. ग्रीनच्या पाठीच्या खालच्या बाजूला फ्रॅक्चर झालं आहे. शस्त्रक्रियेननंतर त्याला किमान सहा महिने विश्रांतीची गरज आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
क्रिकेट ऑस्टेलियाच्या मेडिकल स्टाफने मागील दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या चर्चेनंतर ग्रीनबाबत हा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं म्हणणं आहे की शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होणे आणि पुनरागमन करणे संपूर्णपणे खेळाडूवर अवलंबून असतं. यामध्ये 9 महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो. मात्र ग्रीन सहा महिन्यातच पुनरागमन करेल असेल असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आहे.
( नक्की वाचा : IND vs AUS: रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर )
सहा महिने क्रिकेटपासून दूर म्हणजे ग्रीन भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिज, श्रीलंकाविरुद्धची टेस्ट सीरिज आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्येही सहभागी होऊ शकणार नाही. याशिवाय IPL मध्येही ग्रीन सहभागी होऊ शकणार नाही. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया पोहोचली तर तिथेही ग्रीन खेळू शकणार नाही.
(नक्की वाचा - PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानचं घरच्या मैदानावर वस्त्रहरण, 556 रन करुनही एका इनिंगनं पराभव)
ESPN क्रिकइन्फोला मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडचे सर्जन ग्रॅम इंग्लस आणि रोवॅन शूटेन ग्रीनवर शस्त्रक्रिया करु शकतात. या दोन्ही डॉक्टरांना यासारख्या दुखापतग्रस्त 26 खेळाडूंवर याआधी उपचार केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जेम्स पॅटिंसनला देखील या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यानंतर 12 महिन्यांनी पॅटिंसनने पुनरागमन केलं होते.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world