
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला आहे. त्यामुळे त्यांची थेट तुरुंगात रवानगी झाली आहे.
मायकल स्लॅटर यांच्यावर घरगुती हिंसाचारासह मारहाण करणे, पाठलाग करणे, रात्रीच्या वेळी घरात घुसून धमकावणे, हल्ला करणे, फोन-मेसेज करुन शिवीगाळ करणे यासारख्या गंभीर गुन्हांची नोंद आहे. या प्रकरणी क्वीन्सलँड न्यायालयाने मायकल स्लॅटर यांना जामीन नाकारत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने शिक्षा सुनावताच स्लॅटर यांना धक्का बसला. न्यायाधीशांनी निकाल देताच स्लॅटर कोर्टातच जमिनीवर कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, मायकल स्लॅटर यांच्यावर 5 डिसेंबर ते 12 एप्रिल दरम्यान जवळपास 19 आरोप करण्यात आले आहेत.
मायकल स्लॅटर यांची कारकीर्द
मायकल स्लॅटर यांनी 1993 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ते 2003 पर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होते. ऑस्ट्रेलियासाठी मायकल स्लॅटर यांनी 74 कसोटी सामने खेळले आहेत. तर 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
मायकल स्लॅटर यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 42.84 च्या सरासरीने 5312 धावांची नोंद आहे. कसोटीमध्ये स्लॅटर यांच्या नावे 14 शतकं आहेत, तर 21 अर्धशतकं आहेत. 42 एकदिवस सामन्यात स्लॅटर यांच्या नावे 987 धावा आहेत.
पराभवग्रस्त RCB च्या अडचणीत वाढ, ग्लेन मॅक्सवेलनं घेतला मोठा निर्णय
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्लॅटर यांनी क्रिकेट कॉमेन्ट्रीची वाट धरली. अनेक वर्षांपासून ते कॉमेन्ट्रेटर म्हणून काम करत होते. मायकल स्लॅटर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉमेट्रीमधील मोठं नाव आहेत. मात्र आता मायकल स्लॅटर यांच्यावर तुरुंगवासाची नामुष्की ओढावली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world