
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा 23-24 मे रोजी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण असेल, याबाबतचा निर्णय देखील बीसीसीआय संघनिवडीच्या वेळी घेणार आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या घोषणेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुत्रानुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीला वगळले जाऊ शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने शमीच्या फिटनेस आणि फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वृत्तात म्हटले आहे की, शमीची निवड त्याच्या कामगिरीवर होणार आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही महिन्यांनंतर परतला आहे. पण तो लयमध्ये दिसत नाही. सामान्यतः भारतीय संघांची निवड करताना आयपीएलमधील कामगिरी विचारात घेतली जात नसली तरी, शमीला त्याचा रन-अप पूर्ण करताना संघर्ष करावा लागत आहे. चेंडू यष्टिरक्षकापर्यंत पोहोचत नाही. तो वारंवार विश्रांतीसाठी ड्रेसिंग रूममध्ये परत जात आहे. त्यामुळे त्याची निवड होईल की नाही याबाबत शंका आहे.
जरी आयपीएलमधील कामगिरीचा कसोटी संघनिवडीत फारसा विचार केला जात नसला तरी, शमीच्या सध्याच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सातत्याने चांगली कामगिरी न करू शकल्यामुळे निवड समिती शमीला संघात स्थान द्यायचे की नाही याबद्दल विचार करत आहे. सुरुवातीला, शमी आणि बुमराह यांना कसोटी मालिकेत रोटेट करण्याची योजना होती. पण वर्कलोडमुळे बुमराह स्वतः केवळ दोन किंवा तीन सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
वनडे विश्वचषक 2023 नंतर शमी दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर होता. त्याने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले असले तरी, त्याच्या गोलंदाजीमध्ये ती धार दिसत नाही. आयपीएल 2025 मध्ये त्याची कामगिरी विशेष चांगली राहिलेली नाही. त्याने आयपीएलमध्ये 11.23 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 6 विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक (India vs England Test Series Schedule)
- पहिला कसोटी सामना - 20 जून ते 24 जून
- दुसरा कसोटी सामना - 2 जुलै ते 6 जुलै
- तिसरा कसोटी सामना - 10 जुलै ते 14 जुलै
- चौथा कसोटी सामना - 23 जुलै ते 27 जुलै
- पाचवा कसोटी सामना - 31 जुलै ते 4 ऑगस्ट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world