जाहिरात
Story ProgressBack

IPL 2024 : तुमच्या आवडत्या टीमचे कोणते खेळाडू खेळणार? पाहा सर्वांची संभाव्य Playing 11

प्रत्येक आयपीएल टीमची संभाव्य प्लेईंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेयर कोण असेल हे पाहूया

Read Time: 5 min
IPL 2024 : तुमच्या आवडत्या टीमचे कोणते खेळाडू खेळणार? पाहा सर्वांची संभाव्य Playing 11
मुंबई:

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या लढतीनं आयपीएलच्या सतराव्या सिझनची सुरुवात होतीय. गतविजेत्या सीएसकेनं आजवर पाचवेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर आरसीबीची विजेतेपदाची प्रतीक्षा कायम आहे. या सिझनमध्ये एकूण 10 टीम्स खेळणार असून सर्वांनी आपल्या कॅप्टनची घोषणा केलीय. 

6 टीमचे नवे कॅप्टन

सनरायझर्स हैदराबादनं एडन मार्करामच्या ऐवजी पॅट कमिन्सकडं नेतृत्त्व सोपावलंय. तर मागील सिझन खेळू न शकलेले ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स) आणि श्रेयस अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) या कॅप्टननी यंदा पुनरागमन केलंय. मुंबई इंडियन्सनं त्यांचा आजवरचा सर्वात यशस्वी कॅप्टन रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केलीय. शुभमन गिल हा यंदा प्रथमच गुजरात टायटन्सची धूरा सांभाळणार आहे. तर स्पर्धेच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सनं महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडची कॅप्टन म्हणून नियुक्ती केलीय. एकूणच गेल्या सिझनचा विचार केला तर सहा नवे कॅप्टन यंदा आपल्या टीमसह मैदानात उतरणार आहेत. 

प्रत्येक आयपीएल टीमची संभाव्य प्लेईंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेयर कोण असेल हे पाहूया

सीएसकेची संभाव्य प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड
राचिन रविंद्र *
अजिंक्य रहाणे
शिवम दुबे
डॅरेल मिचेल/मोईन अली *
रविंद्र जडेजा
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन/विकेट किपर)
शार्दूल ठाकूर
दीपक चहर
महीश तीक्षाणा *
मुस्तफिजूर रहमान *
इम्पॅक्ट प्लेयर : समीर रिझवी

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

ऋषभ पंत आयपीएलपूर्वी फिट झाल्यानं दिल्लीच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. पंत 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या कार अपघातामध्ये जखमी झाला होता. या मोठ्या अपघातानंतर पंत पहिल्यांदाच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार आहे. तो प्रत्येक सामना खेळणार नसून त्याच्या अनुपस्थितीमध्ये डेव्हिड वॉर्नर दिल्लीचं नेतृत्त्व सांभाळणार आहे. हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स या आक्रमक खेळाडूंना दिल्लीनं या सिझनमध्ये करारबद्ध केलंय. हॅरी ब्रूकनं ऐनवेळी माघार घेतल्यानं दिल्ली कॅपिटल्सला धक्का बसलाय. त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्सला संधी मिळू शकते.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेईंग 11
डेव्हिड वॉर्नर*
पृथ्वी शॉ
मिचेल मार्श*
ऋषभ पंत  (कॅप्टन/विकेट किपर)
ट्रिस्टन स्टब्स*
अक्षर पटेल
कुमार कुशाग्र
कुलदीप यादव
एनरिच नॉर्खिया*
मुकेश कुमार
खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेयर : ललित यादव

गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )

गुजरात टायटन्सनं 2022 साली पहिल्याच सिझनमध्ये विजेतेपद पटकावलं. तर मागील सिझनमधील फायनलच्या अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत ते विजेतेपदाच्या जवळ होते. यंदा गुजरात प्रथमच हार्दिंक पांड्याशिवाय खेळणार आहे. त्याच्या जागी शुभमन गिल टीमचा कॅप्टन आहे. मोहम्मद शमीही दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकणार नाही. त्यामुळे गुजरातच्या प्लेईंग 11 मध्येही बदल होणार आहेत.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11
शुभमन गिल (कॅप्टन)
ऋद्धीमान साहा (विकेटकिपर)
साई सुदर्शन
अझमत ओमरझाई*
डेव्हिड मिलर*
शाहरुख खान
राहुल तेवातिया
राशिद खान*
साई किशोर
उमेश यादव
मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेयर : नूर अहमद/स्पेनसर जॉन्सन*

कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders)

कोलकाता नाईट रायडर्सचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यर मागील सिझन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तो यंदा परतलाय.  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मिचेल स्टार्क केकेआरकडं आहे. त्याला खरेदी करण्यासाठी केकेआरनं तब्बल 24 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत. 2015 नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या स्टार्कवर केकेआरच्या बॉलिंगची मोठी भिस्त आहे.

केकेआरची संभाव्य प्लेईंग 11

व्यंकटेश अय्यर
रहमनउल्लाह गुरबाझ*  (विकेट किपर)
श्रेयस अय्यर (कॅप्टन)
नितीश राणा
हर्षित राणा/मनिष पांडे
रिंकू सिंह
आंद्रे रसेल*
सुनील नरीन*
मिचेल स्टार्क*
वरुण चक्रवर्ती
चेतन सकारिया
इम्पॅक्ट प्लेयर : सूयश शर्मा

लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants)

केएल राहुलच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या लखनौनं मागील दोन्ही सिझनमधील 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला होता. राहुल मागील सिझन खेळताना जखमी झाला होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये कृणाल पांड्यानं संघाचं नेतृत्व केलं होतं. राहुल यंदाही जखमी असून तो आयपीएलपर्यंत फिट होण्याची शक्यता आहे. लखनौनं मार्क वूडच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार शामर जोसेफला करारबद्ध केलंय.

लखनौची संभाव्य Playing 11
केएल राहुल  (कॅप्टन)
क्विंटन डी कॉक*  (विकेट किपर)
देवदत्त पडिक्कल
दीपक हुडा
कृणाल पांड्या
निकोलस पूरन*
मार्कस स्टॉईनिस*
शिवम मावी
रवी बिश्नोई
मोहसीन खान
शामर जोसेफ*

इम्पॅक्ट प्लेयर : आयुष बदोनी

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी करत कॅप्टन केलंय. रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हकालपट्टी केल्यानं मुंबईच्या अनेक फॅन्सनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर कॅमेरुन ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड करत यंदा टीमची नवी रचना असल्याचं मुंबईच्या मॅनेजमेंटनं जाहीर केलंय. मुंबईनं या ऑक्शनमध्ये जेरॉल्ड कोट्सझी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, मोहम्मद नबी या उपयुक्त खेळाडूंना करारबद्ध केलंय.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11
रोहित शर्मा
इशान किशन (विकेट किपर)
तिलक वर्मा
हार्दिक पांड्या (कॅप्टन)
टीम डेव्हिड*
मोहम्मद नबी*
पियूष चावला
जेरॉल्ड कोट्झी*
जसप्रीत बुमराह
नुवान तुशारा*
ल्यूक वूड*

इम्पॅक्ट प्लेयर : नेहल वधेरा


पंजाब किंग्स (Punjab Kings)

पंजाब किंग्स यंदा पुन्हा एकदा शिखर धवनच्या कॅप्टनसीमध्ये स्पर्धेत उतरेल. प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणे हे पंजाबसमोरचे मु्ख्य लक्ष्य आहे. पंजाबनं या ऑक्शनमध्ये हर्षल पटेल, ख्रिस वोक्स या महत्त्वाच्या खेळाडूंना खरेदी केलंय.

पंजाब किंग्सची प्लेईंग 11
शिखर धवन (कॅप्टन)
जॉनी बेअरस्टो*
प्रभसिमरन सिंह
लियाम लिव्हिंगस्टोन*
जितेश शर्मा  (विकेट किपर)
सॅम करन*
हर्षल पटेल
कागिसो रबाडा*
राहुल चहर
अर्शदीप सिंग
हरप्रीत ब्रार
इम्पॅक्ट प्लेयर : अथर्व तायडे

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

राजस्थान रॉयल्सनं आयपीएलच्या पहिल्या सिझनचं विजेतेपद पटाकवून सर्वांना चकित केलं होतं. त्यानंतरच्या 15 सिझनमध्ये त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. संजू सॅमसनच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या राजस्थाननं आयपीएल 2022 मध्ये फायनल गाठली होती. पण,मागील सिझनमध्ये त्यांना 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आलं होतं.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11
यशस्वी जैस्वाल
जोस बटलर*
संजू सॅमसन (कॅप्टन / विकेट किपर)
ध्रुव जुरेल
शिमरॉन हेटमायर*
रियान पराग
रोव्हमन पॉवेल*
आर. अश्विन
ट्रेन्ट बोल्ट*
आवेश खान
युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेयर : संदीप शर्मा/प्रसिद्ध कृष्णा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore)

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्यू प्लेसिस मागील दोन सिझनपासून आरसीबीचा कॅप्टन आहे. यंदाही त्याच्याकडेच टीमचं नेतृत्त्व आहे. आरसीबीनं मुंबई इंडियन्सकडून कॅमेरुन ग्रीनला खरेदी केलंय. त्याचबरोबर लॉकी फर्ग्यूसन, अल्झारी जोसेफ, यश दयाल यांना ऑक्शनमध्ये खरेदी केलं आहे.

आरसीबीची प्लेईंग 11
विराट कोहली
फाफ ड्यू प्लेसिस* (कॅप्टन)
कॅमेरुन ग्रीन*
रजत पाटीदार
ग्लेन मॅक्सवेल*
महिपाल लोमरोर
दिनेश कार्तिक (विकेट किपर)
कर्ण शर्मा
अल्झारी जोसेफ*
मोहम्मद सिराज
आकशदीप
इम्पॅक्ट प्लेयर : अनुज रावत

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

ऑस्ट्रेलिया विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादनं 20 कोटी 50 लाखांना खरेदी केलंय. त्यामंतर अपेक्षेप्रमाणे कमिन्सला टीमचा कॅप्टन करण्यात आलंय. सनरायझर्सनं आयपीएल लिलावात वर्ल्ड कप फायनलचा हिरो ट्रॅव्हिस हेड, श्रीलंकेचा प्रमुख स्पिनर हसरंगा या बड्या खेळाडूंना करारबद्ध केलंय. सनरायझर्सकडं टीम निवडीसाठी अनेक पर्याय असून त्यामधील सर्वोत्तम 11 जण खेळवण्याचं मोठं आव्हान टीम मॅनेजमेंटसमोर असेल.

सनरायझर्सची प्लेईंग 11
मयांक अग्रवाल
अभिषेक शर्मा
राहुल त्रिपाठी
एडन मार्कराम*
ग्लेन फिलिप्स*
हेन्रिच क्लासेन* (विकेट किपर)
पॅट कमिन्स*  (कॅप्टन)
जयदेव उनाडकट
भुवनेश्वर कुमार
मयंक मार्कंडे
उमरान मलिक
इम्पॅक्ट प्लेयर : वॉशिंग्टन सुंदर

टीप : खेळाडूंच्या नावासमोरील * ही खूण ते परदेशी खेळाडू असल्याचे दर्शवितात

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination