जाहिरात
Story ProgressBack

कायरन पोलार्डला मॅच न खेळताही BCCI नं दंड का ठोठावला?

मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच कायरन पोलार्ड ( Kieron Pollard) आणि आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडवर (Tim David) बीसीसीआयनं कारवाई केलीय.

Read Time: 2 min
कायरन पोलार्डला मॅच न खेळताही BCCI नं दंड का ठोठावला?
Kieron Pollard Tim David : कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर बीसीसीआयनं कारवाई केलाीय. (फोटो - BCCI)
मुंबई:


IPL 2024 Mumbai Indians :  मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच कायरन पोलार्ड ( Kieron Pollard) आणि आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडवर (Tim David) बीसीसीआयनं कारवाई केलीय. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (MI vs PBKS)  या सामन्यात या दोघांनी केलेली चूक त्यांना नडलीय. या चुकीबद्दल बीसीसीआयनं त्यांच्या मॅच फिसमधील 20 टक्के दंड लावला आहे. या दोघांनीही आपली चूक मान्य केलीय. मुंबई इंडियन्सनं या सामन्यात पंजाब किंग्जवर 9 रननं निसटता विजय मिळवला होता. 

कोणत्या नियमानुसार दंड?

आयपीएलकडून कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांच्यावर दंडात्मक करावाई करण्यात आल्याची माहिची देण्यात आली आहे. या दोघांवर आचारसंहितेमधील कलम  2.20 लेव्हल 1 अंतर्गत ही कारवाई केली आहे. मॅच रेफ्रीसमोर झालेल्या सुनावणीत या दोघांनी त्यांची चूक मान्य केली. मुंबई इंडियन्सचा माजी ऑल राऊंडर कायरन पोलार्ड आता टीमचा बॅटिंग कोच आहे. त्यामुळे तो प्रत्यक्ष मैदानात खेळण्यासाठी उतरत नाही. त्यानंतरही त्याला चुकीमुळे दंडात्मक कारवाईचा फटका बसलाय. 

( नक्की वाचा : 'पागल है क्या?', कुलदीप यादव सामन्यादरम्यान मुकेश कुमारवर भडकला, VIDEO व्हायरल )

अंपायरच्या निर्णयावर झाला होता वाद

कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हहिड यांच्यावर कोणत्या चुकीमुळे कारवाईचं नेमकं कारण आयपीएलनं प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यामध्ये देण्यात आलेलं नाही. पण, अंपायरच्या निर्णायवरील नाराजी त्यांना भोवली असल्याचं मानलं जातंय. मुंबई इंडियन्सची बॅटिंग सुरु असताना 15 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला होता.

मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव बॅटिंग करत होता. अर्शदीप सिंहनं टाकलेल्या बॉलवर या दोघांनी डगआऊटमधून वाईड बॉलसाठी डीआरएस घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पंजाब किंग्जच्या कॅप्टननं त्यावर आक्षेप घेतला होता. सू्र्यकुमार यादवनं डीआरएस घेतला आणि तिसऱ्या अंपायरनं तो बॉल वाईड असल्याचं जाहीर केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination