जाहिरात
Story ProgressBack

IPL 2024: 3 भारतीय खेळाडू करणार कमबॅक, मुंबई इंडियन्सला होणार सर्वात मोठा फायदा

मागील सिझनमध्ये खेळू न शकलेले 3 महत्त्वाचे खेळाडू यंदा आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहेत.

Read Time: 2 min
IPL 2024: 3 भारतीय खेळाडू करणार  कमबॅक, मुंबई इंडियन्सला होणार सर्वात मोठा फायदा
मुंबई:

टी 20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून यंदाच्या आयपीएलला मोठं महत्त्व आहे. आयपीएलमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळाडू खेळतात. वर्ल्ड कपपूर्वी एकमेकांच्या तयारीचा अंदाज त्यांना या स्पर्धेतून होऊ शकतो. मागील आयपीएलमध्ये न खेळलेले 3 खेळाडू यंदा आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहेत.

आपआपल्या आयपीएल टीमसाठी हे महत्त्वाचे खेळाडू असून ते कसं खेळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

ऋषभ पंत 

ऋषभ पंतचं मैदानावरील पुनरागमन ही या आयपीएलमध्ये घडणारी सर्वात मोठी घटना आहे.  टीम इंडियाचा मुख्य खेळाडू असलेल्या पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातामध्ये जखमी झाला होता. या मोठ्या अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल सुरु होण्याच्या आठवडाभरपूर्वी तो फिट असल्याचं प्रमाणपत्र दिलंय. त्यामुळे त्याचा आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

ऋषभ पंतनं आत्तापर्यंत 98 आयपीएल मॅचमध्ये 147.97 च्या स्ट्राईक रेटनं 2838 रन्स केले आहेत. यामध्ये 15 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सला पंतच्या अनुपस्थितीचा मोठा फटका मागील आयपीएलमध्ये
बसला होता. दिल्लीला मिडल ऑर्डर सावरु शकेल अशा फलंदाजाची कमतरता संपूर्ण सिझनमध्ये जाणवली. त्यामुळे त्यांना 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आलं होतं. दिल्लीच्या फॅन्सचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न आजवर अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी पंत काय कमाल करतो हे या सिझनमध्ये स्पष्ट होईल.

श्रेयस अय्यर

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन असलेला श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मागील सिझन खेळू शकला नव्हता. आयपीएलनंतर श्रेयसच्या कारकिर्दीत मोठे चढ-उतार झाले आहेत. त्यानं वन-डे वर्ल्ड कपमध्ये 66.25 च्या सरासरीनं 530 रन्स केले. पण, वर्ल्ड कपमधील फॉर्म तो नंतर कायम ठेवू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे त्याला उर्वरित सीरिजमधून वगळण्यात आलं. त्यानंतर बीसीसीआयनं जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या यादीतही श्रेयसला जागा मिळालेली नाही.

श्रेयसनं 101 आयपीएल मॅचमध्ये 19 अर्धशतकांसह 2776 रन्स केले आहेत. मागील सिझनमध्ये श्रेयसच्या अनुपस्थितीमध्ये नितिश राणानं केकेआरची कॅप्टनसी सांभाळली होती.  यंदा मुंबईकर कोच चंद्रकांत पंडित आणि नवा मेंटॉर गौतम गंभीरच्या मदतीनं केकेआरला 2014 नंतर पुन्हा विजेतेपद मिळवून देण्यासाठी श्रेयसला जोरदार कंबर कसावी लागणार आहे.

जसप्रीत बुमराह

भारतीय खेळाडूंच्या आयपीएलमधील पुनरामनामधील सर्वात मोठं नाव हे जसप्रीत बुमराहचं आहे. मुंबई इंडियन्सचं मुख्य अस्त्र असलेला बुमराह दुखापतीमुळे मागील आयपीएल खेळू शकला नाही. त्याची अनुपस्थिती मुंबई इंडियन्सला जाणवली होती. कोणत्याही फॉर्मेटमध्ये, कुठल्याही मैदानात आणि कोणत्याही क्षणी मॅचचं पारडं फिरवण्याची क्षमता बुमराहच्या बॉलिंगमध्ये आहे. त्याच्या पुनरागमनामुळे आधीच भक्कम असलेली मुंबई इंडियन्सची टीम आणखी बळकट झालीय.

बुमराहनं आजवर आयपीएलमधील 120 मॅचमध्ये 145 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या पुनरागमनाचा मोठा फायदा मुंबईच्या बॉलिंगला होणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination