छत्रपती संभाजीनगरच्या चाळीसगाव घाटामध्ये दरड कोसळली आहे. दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. रात्री नऊच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळली होती. छत्रपती संभाजीनगर जळगावला जोडणारा हा रस्ता पूर्णतः बंद झालाय तर घटनास्थळी महामार्ग पोलीस देखील दाखल झाले सध्या दरड काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जातायत.