Shivjayantiच्या दिवशी मोठा अनर्थ टळला; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात वाचले| NDTV मराठी

शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला. हेलिकॉप्टरच्या लँडिंग दरम्यान हेलिपॅडवर लावण्यात आलेल्या बॅरिकेडमुळे लँडिंगमध्ये अडचणी आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऐनवेळी हेलिकॉप्टर पायलटनं दिशा बदलून लँडिंग केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघेही थोडक्यात बचावले. हेलिकॉप्टरचा आकार लक्षात न घेताच बॅरिकेडिंग केल्यानं हा प्रसंग उद्भवला असावा अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.तिन्ही महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षित खाली उतरवल्यानंतर पायलटने झालेली चूक स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि मग ती सुधारण्यात आली.

संबंधित व्हिडीओ