राहुल गांधी यांचा फोन आणि Rahul Bondre यांनी निर्णय बदलला, बुलढाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

राहुल गांधी यांचा फोन आणि Rahul Bondre यांनी निर्णय बदलला, बुलढाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट A phone call from Rahul Gandhi led Rahul Bondre to change his decision a major twist in Buldhana politics. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या २२ सप्टेंबरच्या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची आणि त्यानंतर बोंद्रे यांच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ