गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्सव... पण सांताक्रूझमधील एका मंडळाने यंदा या उत्सवाला अध्यात्माची अनोखी जोड दिली आहे....सांताक्रुझमधील प्रसिद्ध गावठाण लेन गणेशोत्सव मंडळाने साक्षात केदारनाथ धामाची प्रतिकृती साकारली असून, विशेष म्हणजे गणरायालाही शिवशंकराच्या रुपात विराजमान करण्यात आलं आहे....मंडळाच्या ४४ व्या वर्षानिमित्त उभारलेला हा देखावा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष अतुल शराफ यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी...