भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत... या प्रकरणाशी संबंधित काही सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शैलेश पाटील यांच्याशी संबंधित जुन्या आर्थिक व्यवहारांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बिल्डर रोहित दीक्षित यांनी धमकावल्याचे आरोप करत कारवाईची मागणी केली असून, खडकपाडा पोलीस योगेश हरड यांचा शोध घेत आहेत. या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.