दरम्यान बीड मधील कार्यक्रमाला पंकजा मुंडे हजर राहणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. तसंच अजित पवारही उपस्थित राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्या आनंदाचा हा क्षण आहे आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाला, पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदार संघाला मिळालेला आहे. म्हणून आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि त्यांचं स्वागत हे जनतेच्या संख्येने आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत.