अकोलातील कौलखेड भागातील एका शाळेत तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय.याप्रकरणी आता आरोपी हेमंत चांदेकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झालाय.शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर गैरफायदा घेत विनयभंग केलाय.. शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातला.. यानंतर त्यानंतर आता कारवाई करण्यात आली.