विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचे सर्वच उमेदवार ठरलेयत.येत्या 27 तारखेला 5 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.भाजपच्या संदीप जोशी,संजय केनेकर आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या संजय खोडकेंनी आज उमेदवारी जाहीर झाली. खोडके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाटेला एक जागा आली होती, या जागेवर चंद्रकांत रघुवंशींना संधी मिळालीय.