कर्नाटकामधल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि त्यामुळे महाराष्ट्रामधल्या दोन जिल्ह्यांचं टेन्शन मात्र वाढलंय. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचं काम थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आता पुढाकार घ्यावा अशी मागणी व्हायला लागली आहे.