मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांना पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरळी पोलिसांनी अटक केली आहे. अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळे गौरी यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.