राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवात बोलताना कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असू शकते, असे ते म्हणाले. 'आपण गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल आणि हे लोक थैमान घालतील,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली.