अमरावती शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शैक्षणिक परिसर असलेल्या भागांमध्येही मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, महापालिकेचे दुर्लक्ष आहे.