मंत्री आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. मनसेच्या बैठकीमध्ये देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत जाण्याचा सूर पाहायला मिळाला. यावरती देखील काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.