आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील उमरंगसो या भागातील कोळशाच्या खाणीमध्ये गेल्या चोवीस तासांपासून अनेक मजूर अडकले आहेत. खाणीमध्ये अचानक पाण्याचा जोर वाढला आणि त्या ठिकाणी पूर आला. शंभर फुटांपर्यंत पाणी वाढल्यानं बचाव कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. आपण हि दोन दृश्य बघत आहोत गेल्या चोवीस तासांपासून इथं बचाव कार्य सुरू आहे.