Beed च्या केज रुग्णालयात अत्याचार पीडीतेचा तपासणीसाठी 35 किमीचा हेलपाटा | NDTV Marathi
बीडच्या केज रुग्णालयात अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीबाबत आरोग्य प्रशासनाचा संतापजनक कारभार समोर आलाय. 25 ऑगस्ट रोजी पीडितेला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र ‘महिला डॉक्टर उपलब्ध नाही’ असा शेरा मारत तिला थेट 35 किलोमीटर दूर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रेफर करण्यात आलं. विशेष म्हणजे, महिला डॉक्टर उपलब्ध नसेल तर इतर ठिकाणाहून डॉक्टर बोलावण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची होती. मात्र ती पार न पाडता पीडितेला आणि महिला पोलिसांना अक्षरशः हेलपाटे मारायला लावले.
#BeedNews #BeedHospital #ndtvmarathi
Assault victim forced to travel 35 km for examination at Beed's Kej Hospital