Pimpri Chinchwad मध्ये चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू | NDTV Marathi
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास एका चेंबरमध्ये अडकून अमोल शिंदे (वय २३) आणि मनोज शिंदे (वय १९) या दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हे कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर दोघांना बाहेर काढले. तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
#pimprichinchwad #maharashtranews #ndtvmarathi
Two workers die after getting trapped in a chamber in Pimpri Chinchwad