Khed|बुरसेवाडीतील ठाकर समाजाच्या कुटुंबाची दयनीय अवस्था, पावसामुळे घराची भिंत कोसळली; Ground Report

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बुरसेवाडीतील डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं छोट्याशा गावात ठाकर समाजाची अवघी चार-पाच घरं आहेत..याच घरांपैकी एका घरात ९० वर्षांचे आनंदा गावडे आपल्या कुटुंबासह राहत होते....मात्र २७ जुलैच्या पहाटेच्या पावसाने या कुटुंबावर काळाचा घाला घातला...मुसळधार पावसामुळे घराची भिंत अचानक कोसळली आणि आनंदा गावडे यांना भेटण्यासाठी आलेली त्यांची मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली...मात्र घरातील आणि शेजाऱ्यांनी जीवाची बाजी लावत दोघांनाही बाहेर काढलं....सुदैवाने मुलगी बचावली, मात्र ९० वर्षांच्या आनंदा गावडे यांचा मृत्यू झाला...आजही या कुटुंबाचं घर त्याच दयनीय अवस्थेत आहे. उर्वरित पडलेल्या भिंतीच्या जागी कुटुंबाने स्वतःच्या पैशातून प्लास्टिकचा कागद लावून कसाबसा निवारा उभा केला आहे. आजूबाजूला जंगल... बिबट्याचा वावर... घराभोवती उदरनिर्वाहासाठी पाळलेल्या शेळ्या... आणि डोक्यावर कायम भीतीचं सावट आहे.

संबंधित व्हिडीओ