पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाजवळ एकोणीस वर्षीय तरुणी जात असताना अनोळख्या व्यक्तीने तिचे केस कापल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेतला. या प्रकरणी चेंबुरी येथील रहिवासी दिनेश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण नसल्याचं चौकशीमध्ये स्पष्ट झालं आहे. पश्चिम रेल्वे च्या दादर रेल्वे स्थानकावरून एकोणीस वर्षीय तरुणी जात असतानाच ही घटना घडली आहे.