मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे....जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे..मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या संख्येने समाजबांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलंय...सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज न्यायासाठी संघर्ष करत आहे...समाजाला वारंवार आश्वासनं देऊन दिशाभूल केली जात असून, आता हा प्रश्न निर्णायक टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे...29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने याच दिवशी शेवटचा आणि निर्णायक लढा उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे....