देशभर गाजलेला नीट पेपरफुटीचा मुद्दा आता लोकसभेतही वादळी चर्चेचा विषय ठरलाय. केंद्र सरकारने परीक्षांमधील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं. आवाजी मतदानाने हे विधेय मंजूर करण्यात आलंय. दरम्यान विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि गोळीबाराचा मुद्दा लावून धरल्यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय..