शहरात पावसाने उघडीप देऊन काही दिवस उलटले तरी मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे अद्याप जैसे थे असल्याने वाहनचालकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एकूण १४४४ खड्डे असून त्यापैकी ९२८ खड्डे बुजवण्यात आले आहेत आणि केवळ ५१६ खड्डे बाकी असल्याचा दावा केला आहे. खड्ड्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागत असून लहान-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पडलेल्या खड्ड्याच्या आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहुयात....