Nashik Rain| गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; परिसरातील मंदिरं पाण्याखाली Report

नाशिक शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही संततधार सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सध्या 8,160 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या वाढलेल्या विसर्गामुळे रामकुंड परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून परिसरातील जवळपास सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना आणि भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.

संबंधित व्हिडीओ