मुंबई महापालिकेतील नेत्यांसाठी नव्या वाहनांच्या खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांची उपरोधिक पद्धतीने खिल्ली उडवत खेळण्यातील इनोव्हा गाड्या पालिका आयुक्तांकडे पाठवल्या आहेत.जनतेचा पैसा खर्च करून नव्या गाड्या घेण्याची गरज नसल्याचा दावा करत, तुम्हा सर्वांना मनसेकडूनच इनोव्हा गाड्या पाठवतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.या अनोख्या आंदोलनामुळे पालिका वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.