इराण इस्रायल युद्ध भडकलं असतानाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका लक्षात घेऊन खामेनी यांनी आपले तीन उत्तराधिकारी निवडल्याचे समजते. अलीरेजा अराफी अली असगर हेजाजी, हासिम हुसैनी बुशहरी, अली अकबर वेलायती अशी त्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे यात खामेनी यांचा मुलगा मुजतबा खामेनी यांचं नाव नाही. इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची तीन दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं मानलं जातंय. खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे.