सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचा वाद आता टोकाला पोहोचला. आज इम्तियाज जलील यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. जलील यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल चुकीचा शब्द वापरला असल्याचा आरोप मोर्चेकरी यांच्याकडून केला जात आहे. तर या मोर्च्यात प्रत्येकी 1 हजार रुपये देऊन लोकांना बोलवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर मोर्चे काढण्यापेक्षा जलील यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर दिले पाहिजे असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.