US Attacks Iran| इराणच्या संसदेचा मोठा निर्णय, होर्मूजची खाडी बंद; तेलाच्या किंमती वाढणार? | NDTV

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे आणि दरवाढीचे संकट येऊ शकते. होर्मूजच्या खाडीतूनच युरोपात तेलाची निर्यात होते.. त्यातच इस्रायलसोबतच्या तणावानंतर आता इराणने होर्मूज खाडी बंद करण्याचा निर्णय घेतलाय.. दरम्यान यामुळे तेलाच्या किंमती वाढणार का याकडे लक्ष लागलंय... ९६ मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी २१ मैल रुंद आहे. ही होर्मुझची सामुद्रधुनी ओमानचे आखात, अरबी समुद्र यांना जोडते. येथूनच जहाजे पुन्हा हिंदी महासागराकडे वळतात. पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधन तेलाचे सध्या असलेले ७५ डॉलर प्रति बॅरल हे दर थेट १२० ते १३० डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

संबंधित व्हिडीओ