#pahalgamAttack #operationsindoor #monsoonsession संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात गोंधळामुळे कामकाज ठप्प झाल्यानंतर, आता 'ऑपरेशन सिंदूर' या महत्त्वाच्या विषयावर लोकसभेत सोमवार, २८ जुलैपासून विशेष चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी तब्बल १६ तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. परदेश दौरा आटोपून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.