महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या लाडू प्रसादाच्या दरावरून भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. २५ जुलैपासून पुन्हा सुरू झालेल्या लाडू प्रसादाची विक्री ३० रुपये प्रति लाडू या दराने होत असून, यामुळे प्रसादाचा दर अंदाजे ६०० रुपये प्रति किलो पडत आहे. या वाढलेल्या किमतींमुळे लाडू खरेदी करणाऱ्या भाविकांची संख्या घटली असून, पुजाऱ्यांनीही मंदिर संस्थानला दर कमी करण्याची मागणी केली आहे.