पुणे शहरात पोलिसांनी एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक उच्चभ्रू व्यक्तींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.