विलास घुले हत्या प्रकरणाला दोन महिने उलटले, मात्र न्यायासाठी घुले कुटुंबीयांची लढाई अजूनही सुरूच आहे...सौरव सोनवणे याला अटक करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीयांचं गेल्या 18 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र या आंदोलनात सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारा क्षण आला, तो विलास घुले यांच्या पत्नीने विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर. उपचार घेऊन पुन्हा उपोषणस्थळी दाखल होत त्यांनी सरकारला थेट सवाल केला आहे..... त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी..