मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का?,Shweta Tiwariचा थेट Raj Thackeray यांना सवाल; नेमकं प्रकरण काय?

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’ या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आहे. मात्र गुरुवारी सोशल मीडियावर ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत तिला ऑनलाइन शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्सचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे यातील काही जण स्वत:ला मराठी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक असल्याचं सांगत असल्याचं श्वेताने नमूद केलं. श्वेताने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महिलांना सोशल मीडियावर अशा प्रकारे अपमानित करण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

संबंधित व्हिडीओ