पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवल्यानं बडतर्फीची कारवाई, अंगणवाडी सेविका देवयानी पारधी NDTV मराठीवर

अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ टाकल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे ..अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासनाकडून पुरवला जाणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावरच कारवाई करण्यात आलीय. 9 ते 10 शिट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा?" असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला होता. याविषयी संबंधितांवर कारवाई करायचं सोडून देवयानी पारधींवरच कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे सत्यत दाखवणं चूक आहे का असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

संबंधित व्हिडीओ