BMC| पालिकेकडून कबुतरखाने बंद करण्यास सुरूवात, खाद्य देणाऱ्यांकडून 55 हजारांचा दंड वसूल

मुंबईतील कबुतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयाने मंगळवारी महापालिकेला मज्जाव केला.त्याचवेळी, महापालिकेच्या कारवाईविरोधातील याचिकेत न्यायालयाने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश देताना महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. दुसरीकडे महापालिकेने कबुतरखाने बंद केल्यानंतर कबुतरांना खाद्य देणाऱ्यांकडून महापालिका दंड वसूल करत असून आतापर्यंत १७ महापालिका विभागात कारवाई करण्यात आली आहे.मुंबईत कबूतरांची वाढती संख्या मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून महापालिकेने यावर पावलं उचलत आतापर्यंत ५५ हजारांचा दंड वसूल केला आहे.

संबंधित व्हिडीओ