बुलढाण्यातून बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यामध्ये बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना अज्ञात आजार होतोय. बऱ्याच नागरिकांना तीन दिवसात टक्कल पडल्याची घटना समोर येते आहे. सुरुवातीला डोक्याला खाज येणं आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसात टक्कल पडणं अशा घटना एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास नागरिकांना भेडसावतायत.