इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जलील यांच्यासह तीस आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय. अमित शहां विरोधातील आंदोलनात गाढवाचा वापर करण्यात आल्यानं हा गुन्हा दाखल झालाय तर जमावबंदीचं उल्लंघन देखील करण्यात आलं होतं त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय.