राज आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येण्याची शक्यता आहे. आज राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे. कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये राज ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले होते. दरम्यान आजही ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.