मध्य रेल्वेची वाहतूक 1 तास उशिरानं सुरू आहे.. गेल्या सहा तासांपासून या मार्गावरील प्रवाशांचे हाल झालेत. सकाळी 10च्या सुमारास या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय. सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र आता ऑफिसमधून परतणाऱ्यांची गर्दी होण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढण्यास सुरूवात झालीय.