बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या कटाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींच्या निशाण्यावर अभिनेता आमिर खान होता. आरोपींनी आमिर खान यांच्या घराची तब्बल तीन वेळा रेकी केल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. मात्र संधी न मिळाल्याने आरोपींनी आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला. या संपूर्ण कटामागे लॉरेन्स गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आरोपींनी वांद्रे ते अंधेरी परिसरात पाहणी करत टायगरच्या दिनचर्येवर बारकाईने नजर ठेवल्याचेही समोर आले आहे.