शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत केंद्रात जाणार असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. देशात मोठ्या राजकीय उलटा पालथी होणार आहेत.अशामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पर्याय म्हणून शरद पवार उद्धव ठाकरे लवकरच केंद्रात भाजपसोबत दिसतील.असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी पंढरपुरात केला आहे.दरम्यान बच्चू कडूंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलंय.ठाकरे आणि पवार आमच्या सोबत आले तर चांगलंच आहे.. असं बावनकुळे म्हणालेत