मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वे परिसरात रेल्वेचा हद्दीमध्ये असलेल्या अनधिकृत घरावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.त्यावेळी जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.झोपडपट्टीधारक रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाले होते.त्यानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.. या राड्यात पाच पोलीस जखमी झालेत. दरम्यान, आंदोलकांच्या मोर्चाला परवानगी नसल्यामुळे 20 ते 25 आंदोलकांना जोगेश्वरी पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्याचबरोबर विनापरवानगी आंदोलन केल्याने गुन्हा देखील दाखल करण्यात आला.