Chiplun Rain Updates| चिपळूणमध्ये हाहाकार! वशिष्ठी नदी इशारा पातळीवर,चिपळूण-कराड रोड वाहतुकीसाठी बंद

सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः८२ मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे.कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३५.१५ मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ पासून आज ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. नवजा येथे काल ८ वा पासून आज ८ वाजेपर्यंत ३१६ मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते २ यावेळेत ९६ मिमी पाऊस पडलेला आहे. एक मशिन सुरू आहे.दुपारी ३ः५० वा ओहोटी आहे. संध्याकाळी ०८ः०९ वा ३.३३ मी ची भरती आहे. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत.बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका , वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. सखल भागातील विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.कोळकेवाडी धरण्याच्या मशीन ५.३० वाजता बंद करण्यात आलेल्या होत्या परंतु कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने १ः१० वाजता एक मशीन सुरू करण्यात आलेली आहे व ते पाणी शहरामध्ये २ वा येईल.दसपटी भागातील पावसाचा जोर कमी झालेला आहे ही दिलासादायक बाब आहे. सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. खेर्डी येथे कराड रोडवर पाणी असल्याने व हेळवाक येथे रस्त्यावर पाणी साचल्याने चिपळूण-कराड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. गुहागर रोड सध्या सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ