रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वयाची 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलं-मुली त्यांचं बँक खातं स्वतंत्रपणे चालवू शकतीकल. आरबीआयनं सर्व व्यापारी बँका, खासगी बँका आणि सहकारी बँकांना परिपत्रक पाठवलं आहे. आरबीआयच्या परिपत्रकानुसार कोणत्याही वयाच्या मुलाचं किंवा मुलीचं खातं त्यांच्या नैसर्गिक आणि कायदेशीर पालकांच्या माध्यमातून उघडता येईल. ते बचत खाते असेल किंवा मुदत ठेव खाते असेल. ते खाते आई ही पालक समजून त्यांच्या माध्यमातून उघडलं जाऊ शकतं. 10 वर्षांच्या वयावरील मुला-मुलींकडून ठराविक रकमेपर्यंत आणि ठराविक जोखीम व्यवस्थापन मर्यादेपर्यंत खाते चालवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, या संदर्भातील अटी बँक खातेधारकाला कळवण्यात आल्या पाहिजेत.